एका रात्री झालं काय
गायब झाली लक्ष्मी माय
कुणालाही कळलंच नाय
गेली कुठं आपली माय
कुणी रडलं मोकलून धाय
कुणी म्हणे "but why?"
इकडं पाय तिकडं पाय
माय कुठं गावलीच नाय
थकले सारे एक करून धरणीठाय
इमानदार म्हणती "नक्की येणार आमची माय"
बेईमानाला कळलं जवळ व्हती ती माया हाय
एका रात्रीत उडून गेली... हाय हाय
कुणी म्हणे हि अर्थक्रांती हाय
मायाजालातून सोडवायची आम्हाला माय
कुणी करती बोभाटा अशी कशी हि माय
यात काहीतरी गोम हाय
दोन दिसांनी आली आय
मंद गतीने टाकत एकेक पाय
'गुलाबी' थंडीत पोरं बघती माय
पवित्र इतकी जणू गंगास्नान केलं हाय
दिसता माय पोरं खुलली अशी काय
जणू श्वासात प्राण फुंकला हाय
कुठं गेली व्हतीस माय
पोरं पुसती होउन गरीब गाय
काळी होते पडली म्हणली माय
धुवून आले चेहरा लावून साय
पोरं खुश पाहून आपली माय
उडाली झोप सर्वांची पिऊन कडक 'चाय'
No comments:
Post a Comment