अदभूत असते तुमची आमची स्पर्शबोली
आवाजाने तिची ना मोजता येते खोली
इवलासा जीव साधतसे स्पर्शाने संवाद
आवाजाने तिची ना मोजता येते खोली
इवलासा जीव साधतसे स्पर्शाने संवाद
ईश्वर चरणांचा स्पर्श होता ऐकू येई अंतर्नाद
उत्तरादाखल कधी स्पर्शच बोलून जातो बरेच काही
ऊब मिळते स्पर्शानेच जेव्हा भावना गोठून जाई
एक स्पर्शच दृष्टीहीनास देई जगाचे ज्ञान
ऐश्वर्य ते दरिद्री जे स्पर्शाविना शोधिती पंचप्राण
ओझरत्या स्पर्शानेच लाजते ते लाजाळूचे झाड
औदार्य वाटे खुजे जेव्हा दुरूनच दान करती हात
अंधारातही लक्ख दिसे असता साथ सोबत्याची
अहा उच्चारीते मन प्रातःसमयी येता झुळूक वाऱ्याची
स्पर्शबोलीची बाराखडी शब्दांपेक्षाही बोलकी किती
माणूस प्राणी पक्षी झाडे आपसांत याच भाषेत बोलती
अवघ्या जीवसृष्टीची ही एकच भाषा अगाध तिची हो शक्ती
जगण्यातली कृत्रिमताही होई नतमस्तक तिच्या पुढती

No comments:
Post a Comment