Friday 11 March 2016

तळीरामांची व्यथा

तळीरामांची व्यथा


महाराज का गेलात आम्हांस सोडून 
धुंद दिवसांचे वचन मोडून 
आमचा जप सतत चाले उ ला ला ले ओ 
ऐकुनी तो धावत याल का हो


सुंदर किती असे ती गगनभरारी
त्या मोहक ललना सदैव विचारी
नभात भासे जणू स्वर्गच तो 
आमचा जप सतत चाले उ ला ला ले ओ


कळली जेव्हा स्वर्गयानाच्या सम्पुष्टीची वार्ता
प्रश्न पडला कोण होईल आता दु:खहर्ता
अतीव वेदनेपरी रिचवले जास्तीचे दोन पेग हो
आमचा जप सतत चाले उ ला ला ले ओ


दरवर्षी चातक होतो दिनदर्शिकेसाठी आम्ही
आमुचे भविष्य अन पंचांग आपल्याच हाती स्वामी
तारखांची ना चिंता आम्हां चित्रेच केवळ न्याहाळतो
आमचा जप सतत चाले उ ला ला ले ओ


क्रिकेटच्या मैदानात असे आपुले रूप रंगीबेरंगी
सामन्यानंतर उत्सव चाले जंगी
निस्तेज भासतील सामने तुमाच्याविना हो
आमचा जप सतत चाले उ ला ला ले ओ


सुसाट गाडयांची शर्यत या देशी ही आपलीच कृपा
रोज वाहनांच्या गर्दीत वेगात जावे हा आमुचा मनसुबा छुपा
तुजविण आता ना वेग ना धुंदी हे सुदिनांच्या प्रभो
आमचा जप सतत चाले उ ला ला ले ओ


न दिसले आम्हांस तुमचे मायाजाल
चटक लावूनी अशी नका करू आमुचे हाल
पाने पुसुनी तोंडाला कसे पलायन केले हो
आमचा जप सतत चाले उ ला ला ले ओ


नकळत हळूच गेलात निघून बँका पाह्ती वाट
हे मद्यनरेशा आतुर आम्ही घेऊनी आरतीचे ताट
बुडवले कसे रुपये करोडो, बारचे बिल चुकवता फेस तोंडाला आला हो 
आमचा जप सतत चाले उ ला ला ले ओ 
ऐकुनी तो धावत याल का हो 

No comments:

Post a Comment