होऊन अनावर वरूणराज बरसला
नदी नाल्यात जणू प्रलयच आला
शुष्क पानासम माणूस वाहून गेला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?
क्रोध अनावर वनदेवीचा झाला
वणवा चहूकडे मोकाट पिसाटला
निष्प्रभ माणूस भस्म जाहला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?
रत्नाकर तो अपरिमीत खवळला
फणा काढून फुत्कारीतो वादळाला
फोलपटासम माणूस उडाला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?
हिमालय तो रागाने थरथरला
आवेगाने चित्कारत कडाडला
खड्यासम माणसास दूर सारला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?
सुचविले निसर्गाने पदोपदी माणसाला
कृत्रीम बुद्धी अन् ऐहिकात माणूस गुंगला
दाखवून भावनाशून्य प्रतीमानव ललकारीतो त्याला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?
दुर्लक्षिले माणसाने जन्मदात्या निसर्गाला
लुटले त्यास चौफेर रिझवण्या हव्यासाला
बुभुक्षित माणसाची भूक पेटली शिगेला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?
निसर्ग उलटला माणूस आला काकुळतीला
तत्परतेेेने श्रीरंगाचा धावा केला
मीच पर्वत, मीच समुद्र, मीच अग्नी, मीच वरूण भगवंत तो वदला
उमगले अंततः ब्रम्हांडातील त्या नगण्य कणाला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला
Friday, 24 April 2020
Friday, 3 April 2020
कलोनाशी कट्टी
बेलूक दादा कसा झोपला आहे छान
मिकी तल कलतो आहे पायांची कमान आई बाबा म्हणतात बाहेल नाही जायचं
शांगा मग आम्ही कशं बलं खेलायचं?
कित्ती दिवश झाले फ्लेंडस् च नाही भेटले
चित्ल लंगवून लंगवून कलल्श पन शंपले
कधी तरी फ्लेंडस् ना व्हिलो काॅल कलतो
बोलत नाही नुशत्या उल्याच जाश्त मालतो
स्कूलला शुट्टी आणि डे केलला पन शुट्टी
शगळ्यांशी मी आता घेनाल आहे कट्टी
पला पला घलातच किती वेला खेलनाल
टिवी आनी फोन शालका किती पाहनाल
आजी मनते बाहेल कलोना लाक्शश आला आहे
मी तल त्याला आता फोनच लावनाल आहे
का गं कलोना आम्हाला अशा त्लाश देतोश
शांगू का तुझ्या आईला तू काय काय कलतोश
तू जा आनी पुन्ना कद्दी येऊ नकोश
आम्माला खेलू दे मधे मधे कलू नकोश
तुझ्याशी पन मी कट्टी घेतली आहे
पापा आनी साबनाशी गट्टी आता केली आहे
आता मी दमले, कलते थोला वेल निन्नी
तू पन तुझ्या घली जा आनी खेल तुझी खेलनी
उठल्यावर मी खानाल गोल गोल चिला
तुझी आई काय देनाल जाऊन विचाल तिला
तू जा आनी खेल तुझ्या फ्लेंडस् बलोबल
नाही तल डाॅक्तल काका देतील इंजू ढुंगुवल
मग बसशील ललत जाशील इथून पलून
हॅप्पी होईन मी पुन्हा फ्लेंडस् ना भेटून
Subscribe to:
Posts (Atom)