Tuesday, 21 March 2017

चलो थोड़ासा जी लेते हैं

चलो थोड़ासा जी लेते हैं,
मधुर रस जीवन का पी लेते हैं।
थोड़ा थमकर, थोड़ा रुककर
जिंदगी कि छोटी खुशीया बटोरकर
उसे महसूस करते हैं।

सुंदर घोंसला चिड़िया जो बनायें
देखकर उसे दिल खुश हो जाये
कभी हसके खिलखिलाती गुड़िया के साथ
कभी प्यार से थामकर बुढे माँ बाप का हाथ
चलो थोड़ासा जी लेते हैं।

नन्हासा पौधा जीना चाहे 
गलते नल का पानी पी कर
चलो उसकी इर्द गिर्द फ़ैली मिट्टी को सवार कर
उसके बढ़ने कि उम्मीद रखते हैं
चलो थोड़ासा जी लेते हैं।

बचे हुए मैदानों में बच्चे खेलतें हैं
कभी उन मैदानों कि पुकार सुनकर
बच्चों के साथ बच्चा होकर
कुछ खेल खेलते हैं
चलो थोड़ासा जी लेते हैं।

पूनम कि रात सर उठाकर
चलो देखें चाँद का रूप सुंदर
अमावस कि रात झिलमिलाती चाँदनिया देखकर
रविवार को उगते सूरज के लाल रंग में घुलकर
चलो थोड़ासा जी लेते हैं।

शहर में छोटासा चुलबुलाता नहर
दौड़ता हैं इधर से उधर
कभी उसके पास रुककर
बहता हुआ संगीत सुन लेते हैं
चलो थोड़ासा जी लेते हैं।

अंतिम स्थान तो सबका निश्चित हैं
वहा उपरवाला एकही सवाल पूँछता हैं
"कैसी थी जिंदगी?"
तब तो सोच में नहीं पड़ना हैं
चलो इस सवाल का जवाब ढूँढ़ते हैं
चलो थोड़ासा जी लेते हैं।

Wednesday, 22 February 2017

आम्ही रंगारी


जगात भारी आम्ही रस्त्याचे रंगारी
रंगवितो रस्ता उडवून मुखातून पिचकारी
कुणाची लाल, कुणाची तांबडी तर कुणाची केशरी
नेम धरून उडवण्यात आमची खरी कलाकारी

भिकारी ते पुढारी सारेच रंगारी
काही तर चालविती उंची मोटारी
रंगकाम चाले दिवसा अन रात्री
कुणाचे काम हळू तर कुणाची अविरत फॅक्टरी

बिनधास्त हे पाहा यांची बेफिकिरी
इमारतीच्या जिन्यामधला देवही जीव मुठीत धरी
कुणाची छोटीच तर कुणाची लांबसडक अदाकारी
गलिच्छ काम करूनही चेहऱ्यावर मगरूरी

यांना न तमा कुणाची यांची बातच न्यारी
स्वच्छता अभियानाला यांनी फेकले माळ्यावरी
पान, गुटखा, तंबाखूशी यांची घनिष्ट यारी
स्वच्छ, शुद्ध या शब्दांनीच यांना येई शिसारी

यांच्याच धुंदीत हे नकोत बोल कुणाचे उपदेशापरी
स्वकष्टाच्या कमाईनेच खाऊन रंगवतो हि गुर्मी उरी
क्षयरोग, प्रदूषण, घाणीची चिंता इतरांनीच केलेली बरी
रंगकामात तशी नाही काही मजा पण सवयीनेच ओढतात री

रंगाऱ्यांनो तुमची नक्षी पाहण्याची का इतरांस बळजबरी
पुढची पिढी असेलच कि वाढत तुमच्याही घरी
स्वच्छ सुंदर आरोग्यमय परिसर हि तर सर्वांचीच जबाबदारी
द्या हो सोडून रंगकाम फुलवू या नंदनवन दारोदारी

Tuesday, 22 November 2016

लक्षमी माय


एका रात्री झालं काय
   गायब झाली लक्ष्मी माय
कुणालाही कळलंच नाय
   गेली कुठं आपली माय


कुणी रडलं मोकलून धाय
   कुणी म्हणे "but why?"
इकडं पाय तिकडं पाय
   माय कुठं गावलीच नाय


थकले सारे एक करून धरणीठाय
   इमानदार म्हणती "नक्की येणार आमची माय"
बेईमानाला कळलं जवळ व्हती ती माया हाय
   एका रात्रीत उडून गेली... हाय हाय


कुणी म्हणे हि अर्थक्रांती हाय
   मायाजालातून सोडवायची आम्हाला माय
कुणी करती बोभाटा अशी कशी हि माय
   यात काहीतरी गोम हाय


दोन दिसांनी आली आय
   मंद गतीने टाकत एकेक पाय
'गुलाबी' थंडीत पोरं बघती माय
   पवित्र इतकी जणू गंगास्नान केलं हाय


दिसता माय पोरं खुलली अशी काय
   जणू श्वासात प्राण फुंकला हाय
कुठं गेली व्हतीस माय
   पोरं पुसती होउन गरीब गाय


काळी होते पडली म्हणली माय
   धुवून आले चेहरा लावून साय
पोरं खुश पाहून आपली माय
   उडाली झोप सर्वांची पिऊन कडक 'चाय'Thursday, 6 October 2016

फ्लेक्स


जिकडे तिकडे चोहीकडे
फ्लेक्सच फ्लेक्स दिसती खडे
काही छोटे काही बडे
प्रत्येकाचे अजबच रुपडे


काका, मामा, दादा, भाऊ
फ्लेक्स वेगळा प्रत्येकाचा पाहू
शक्तिप्रदर्शन करती कोणी दाखवून बाहू
तर कोणी जणू म्हणते गिळू कि खाऊ


पैलवान मिरवती सुवर्णालंकार भारी
फिकी पडते रूपात बाजूच्या फ्लेक्सवरील नारी
कुणाची दाढी कुणाचा फेटा तर कुणाची मिशीच न्यारी
गल्लीलाही प्रथमच कळते कशी दिसते ती स्वारी


प्रतिवर्षी जन्माष्टमीला साधारण सुरु होतो हंगाम
गणेशोत्सवात तर गणेशालाही फुटतो घाम
नवरात्री, दसरा-दिवाळीतील काय वर्णावा तामझाम
हॅपी न्यु ईयर नंतरच थोडासा मिळतो आराम


वाढदिवस, निवडणूक वा असो आलेला पहिला नंबर
सगळ्यांचीच शान किती असो वयवर्ष एक वा शंभर
जयंती पुण्यतिथी प्रसंग किती हे ढीगभर
दिवस कमी पडती तरी उत्सव चाले वर्षभर


महंतांच्या प्रतिमा फ्लेक्सवर कुठेतरी कोपऱ्यात
गल्लीतील चिल्लीपिल्ली मात्र त्यावर मिरवती दिमाखात
कशात नाही काही तरी धन्यता वाटे फ्लेक्सवर झळकण्यात
मूल्यवान ते तारुण्य चालले बिनकामी शेखी मिरवण्यात


येता जाता मंदिरातील देवाला करतो मी प्रार्थना
कृपा कर आणि सद्बुद्धी दे या सर्वांना
दिसत नाही तरीही फ्लेक्सची संख्या कमी होताना
मग उमजले दिसणार मी कसा देवाला मंदिरापुढे फ्लेक्स असताना

Wednesday, 21 September 2016

क्यों बैठा हैं तु निराश?


जमीं पर चलती एक नन्ही चींटी
जरासा रुक कर मुझको बोली
यूँ गुमसुम शांत शांत
क्यों बैठा हैं तु निराश?

चल उठ कुछ काम कर
ऐसे ना समय बरबाद कर
खुद को ना बना जिंदा लाश
क्यों बैठा हैं तु निराश?

देख वह चिड़ीया कैसे मेहनत कर
सुखे पत्ते और घास को चुभकर
घोसला बनाये कितना ख़ास
क्यों बैठा हैं तु निराश?

नदिया का पानी बहना रुकता नहीं
गर्मी, बारिश और ठंड का मौसम चुकता नहीं
छोड़ दे बीते हुए कल को लेके एक लंबी सांस
क्यों बैठा हैं तु निराश?

मैं तो रुक नहीं सकती एक भी पल
मेहनत करु तो देख सकु मैं कल
तु तो इंसान हैं ला सकता हैं किसी जीवन में प्रकाश
क्यों बैठा हैं तु निराश?

थक जाएं तो तु कर थोड़ासा आराम
लेक़िन तु रुक मत जब तक ना होवे ज़िंदगी की शाम
जीवन व्यर्थ ना कर ऐसे बैठे हुए उदास
क्यों बैठा हैं तु निराश?

मैं भी इंसान का जनम ले चुकी हूँ
मोक्ष कि राह पे चल चुकी हूँ
बहुत कुछ करना रह गया जो था दिल के पास
क्यों बैठा हैं तु निराश?

Friday, 27 May 2016

स्पर्शबोलीची बाराखडी

दभूत असते तुमची आमची स्पर्शबोली
वाजाने तिची ना मोजता येते खोली
वलासा जीव साधतसे स्पर्शाने संवाद
श्वर चरणांचा स्पर्श होता ऐकू येई अंतर्नाद 

त्तरादाखल कधी स्पर्शच बोलून जातो बरेच काही 
ब मिळते स्पर्शानेच जेव्हा भावना गोठून जाई 
क स्पर्शच दृष्टीहीनास  देई जगाचे ज्ञान 
श्वर्य ते दरिद्री जे स्पर्शाविना शोधिती पंचप्राण 

झरत्या स्पर्शानेच लाजते ते लाजाळूचे झाड
दार्य वाटे खुजे जेव्हा दुरूनच दान करती हात
अंधारातही लक्ख दिसे असता साथ सोबत्याची 
अहा उच्चारीते मन प्रातःसमयी येता झुळूक वाऱ्याची 

स्पर्शबोलीची बाराखडी शब्दांपेक्षाही बोलकी किती
माणूस प्राणी पक्षी झाडे आपसांत याच भाषेत बोलती
अवघ्या जीवसृष्टीची ही एकच भाषा अगाध तिची हो शक्ती 
जगण्यातली  कृत्रिमताही होई नतमस्तक तिच्या पुढती

Friday, 6 May 2016

देवाला नमस्कार!

मी जेव्हा जेव्हा देवाची मूर्ती पाहतो
देवाला नमस्कार करतोच करतो
तो माझ्याकडे पाहतो कि नाही ठाऊक नाही
पण मी त्याच्याकडे पाहुन नमस्कार करतो

मी प्रत्येक मंदिरासमोर नमस्कार करतोच
पण मी जेव्हा जेव्हा देवघरासमोरुन जातो
तेव्हा प्रत्येक वेळी देवाला नमस्कार करतो
तो माझ्याकडे पाहतो कि नाही ठाऊक नाही
पण मी त्याच्याकडे पाहुन नमस्कार करतो

मी रोज सकाळी पूजा करुन फुलं वाहतो
धूप उदबत्त्या लावून सगळीकडे धूर करतो
शेजारी बसलेला ठसक्याने हैराण होतो
तरीही मी देवाला नमस्कार करतो
तो माझ्याकडे पाहतो कि नाही ठाऊक नाही
पण मी त्याच्याकडे पाहुन नमस्कार करतो

मी न चुकता मंदिरातल्या देवाला अभिषेक करतो
माझ्याकडे लक्ष ठेव अशी विनवणी करतो
मंदिराबाहेरील भिकार्याकडे करुणेने पाहुन पुढे जातो
मागे वळुन पुन्हा देवाला नमस्कार करतो
तो माझ्याकडे पाहतो कि नाही ठाऊक नाही
पण मी त्याच्याकडे पाहुन नमस्कार करतो

गुरुंच्या मठात मी नेहमी जातो
त्यांची सेवा म्हणून दर महिन्याला देणगी देतो
परतताना भाजीवाल्याशी दहा रुपयांसाठी घासाघीस करतो
अंमळ चार भेंड्या जास्त मिळाल्याने खुश होतो
देव माझ्याकडे पाहतो कि नाही ठाऊक नाही
पण मी त्याच्याकडे पाहुन नमस्कार करतो

देव एकदा स्वप्नात आला म्हणाला एक गोष्ट सांगतो
तु जिथे जिथे नमतोस मी तिथे नसतो
ज्याच्याशी तु भांडलास तो भाजीवाला मी होतो
ज्याला अव्हेरलेस तो भिकारी मी होतो
तु जेव्हा जेव्हा माझ्याकडे पाहुन नमस्कार करतो
तेव्हा तेव्हा मी तुला बाजूला उभा राहुन पाहतो

का तु मला विनाकारण मुर्त्यांमध्ये शोधतो
मी सर्वत्र आहे अगदी तुझ्यातही वास करतो
खुळ्या कल्पना आणि अंधश्रद्धेला का जोपासतो
माणसांतला माणूस ज्याला दिसतो
त्यालाच मी डोळे भरून पाहतो